आत्मनिर्भर : 83 तेजस विमानांच्या खरेदीला मंजूरी

नवी दिल्ली, दि. 13 – हवाई दलासाठी 48 हजार कोटी रुपयांच्या देशांतर्गत विकसित केलेल्या 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निर्णयाला सरकारने आज मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची महिती दिली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याच्या दृष्टीने हा व्यवहार “गेम चेंजर’ ठरेल. आगामी कही काळामध्ये भारतीय हवाई दलाच्या मारक क्षमतेमध्ये तेजस विमाने ही महत्वाचा आधार ठरतील, असेही राजनाथ सिंह यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

तीन वर्षांपूर्वी हवाई दलाने 83 तेजस विमानांच्या खरेदीसाठी प्राथमिक निविदा काढली होती. या विमानांमध्ये पूर्वी कधीही वापरली न गेलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या विमानांमधील भारतीय तंत्रज्ञानाचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांवरून 60 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. विमान उत्पादक हिंदुस्थान एरॉनॉटिक्‍स लिमिटेडने नशिक आणि बंगळूरु येथील केंद्रांमध्ये यापूर्वीच आणखी एका उत्पादन केंद्रांची सुरुवात केली आहे. यामुळे ही विमाने हवाई दलासाठी वेळेवर उपलब्ध होऊ शकतील, असा विश्‍वास राजनाथ सिंह यांनी व्यक्‍त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.