भारत होणार सुपरसॉनिक…! लढाऊ विमानांच्या पाचव्या पिढीच्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली – प्रगत मध्यम आकाराची लढाऊ विमाने (एएमसीए) किंवा लढाऊ विमनांच्या पाचव्या पिढीचे स्वयंनिर्मीत उत्पादन करण्यास भारत आता सज्ज झाला आहे. त्यात प्रगत स्टेल्थ फिचर्स सोबत सुपरक्रुझ क्षमताही आहेत. एएमसीएच्या दुहेरी इंजीनची अभियांत्रीकी निर्माणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल मंत्रीमंडळ समितीला पुढील वर्षाच्या सुरवातीला पाठवण्यात येणार असून अर्थ मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या चर्चेनंतर त्याला मंजूरी मिळेल.

पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. या पिढीतील विमाने सध्या जगात केवळ अमेरिकेचीे एफ/ए – 22 आणि एफ – 35लायटनिंग-2 जॉंइंट स्ट्राईक फायटर; चीनीे चेंगडू जे-20 आणि रशियाची सुखोई – 57 ही विमाने कार्यरत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, जे 20 आणि सुखोई लढाऊ विमाने पूर्णार्थाने पाचव्या पिढीतील विमाने नाहीत. त्यात काही गोष्टींची कमतरता आहे. भारतीय हवाई दलात सप्टेंबर 2016मध्ये 59 हजार कोटी रुपयांच्या झालेल्या करारानंतर समाविष्ट होणारी 36 राफेल विमाने ही 4.5 व्या पिढीतील आहेत.

25 टनी एएमसीएच्या विकासाचा खर्च 15 हजार कोटी रुपये अपेक्षित आहे. त्याच्या नमुन्याचे पहिले विमान 2025 -26 मध्ये बाहेर येईल. तर त्याचे उत्पादन 2030 – 31मध्ये सुरू करण्याचे उद्दीष्ट संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) आणि त्यांच्या विमान विकास यंत्रणेने (एडीए) ठेवले आहे. मात्र या एएमसीए विमानांचे येणारे अडथळे लक्षात घेता 2035 पर्यंत भारतात तयार होऊ शकतील.

एएमसीए प्रकल्प भारतीय हवाई दलासाठीही गुंतागुंतीचा अहे. कारण, त्यांच्याकडे सध्या 30 ते 32 फायटर स्वाड्रन आहेत. त्यांच्या मंजूर असलेल्या 42 पदांची भरती होऊ शकली नाही. येत्या 10 ते 15 वर्षात आवश्‍यक प्रमाणात भरती होण्याची शक्‍यता धुसर आहे.

हवाई दलाच्या दर्जात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी तपशीलवार एएमसीए आरेखनाला 2018 मध्ये मंजूरी मिलाली. मात्र त्या विमानांच्या आवश्‍यक शक्तीशाली इंजिनाची गरज ही मुख्य समस्या होती. मात्र ते इंजीन देशात विकसित करण्यात यश मिळाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.