Ind Vs NZ : टी-20 विश्वचषकानंतर लगेचच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित टी-२० मध्ये संघाची कमान सांभाळणार आहे.
– न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंडियाची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज यांचा या टीममध्ये समावेश आहे.
NEWS – India’s squad for T20Is against New Zealand & India ‘A’ squad for South Africa tour announced.@ImRo45 named the T20I Captain for India.
More details here – https://t.co/lt1airxgZS #TeamIndia pic.twitter.com/nqJFWhkuSB
— BCCI (@BCCI) November 9, 2021
– तरुणांना मिळाली संधी
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत अनेक युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, ज्यांनी आयपीएलमध्ये आपले नाव उज्ज्वल केले आहे. त्यात व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड आदी नावांचा समावेश आहे. श्रेयस अय्यर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे, तर विश्वचषकासाठी निवड न झालेला युझवेंद्र चहलही परतला आहे. तर विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा यांना टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
कसोटी मालिकेसाठीचा संघ अद्याप निवडकर्त्यांनी जाहीर केलेला नाही. तिसऱ्या टी-२० सामन्यापर्यंत कसोटी संघाचीही घोषणा केली जाईल, असे मानले जात आहे. विराट कोहली कसोटीत कर्णधार असेल, त्याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती मिळू शकते. असे झाल्यास पहिल्या कसोटी सामन्यात केवळ रोहित शर्माच कर्णधारपदी तर अजिंक्य रहाणे उपकर्णधार असेल.
भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक-
• 17 नोव्हेंबर – पहिला T20 (जयपूर)
• 19 नोव्हेंबर – 2रा T20 (रांची)
• 21 नोव्हेंबर – 3रा T20 (कोलकाता)
• पहिली कसोटी- 25-29 नोव्हेंबर (कानपूर)
• दुसरी कसोटी – 3-7 डिसेंबर (मुंबई)