नवी दिल्ली – पूर्व लडाखजवळ सीमेलगत चीनच्या लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्याच्या घटना मागील काही काळात घडल्या. त्या हवाई कुरापतींबद्दल भारताने चीनकडे तीव्र आक्षेप नोंदवला.
भारत आणि चीनमध्ये नुकतीच लष्करी पातळीवर चर्चेची विशेष फेरी झाली. त्यावेळी चीनी विमानांच्या हालचालींचा मुद्दा भारताने उपस्थित केला. सीमेपासून 10 किलोमीटर अंतराच्या आत तशा हालचाली टाळायला हव्यात. कुठली अनुचित घटना टाळण्यासाठी विश्वास वाढीस लावणाऱ्या पाऊलांवर भर द्यायला हवा, अशी आग्रही भूमिका भारताने मांडली.
जूनच्या अखेरीस आणि त्याआधी चीनी विमाने सीमेजवळ आली होती. त्या कुरापतींवर जरब बसवण्यासाठी भारतीय विमानेही हवेत झेपावली. चीनच्या आगळिकींमुळे 2020 या वर्षाच्या मध्यापासून पूर्व लडाखमध्ये सीमेलगत तणावाची स्थिती निर्माण झाली.
काश्मीरचा विषय शांततेने आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा चीनचा भारताला सल्ला
तो तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये लष्करी पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तशाप्रकारच्या चर्चेत बऱ्याच कालावधीनंतर प्रथमच भारतीय हवाई दलाचा अधिकारीही सहभागी झाला. त्यातून भारताने चीनपर्यंत योग्य संदेश पोहचवला.
संसेदतला कलगीतुरा बारामतीत रंगणार; खासदार सुळेंच्या मतदारासंघात “अर्थमंत्री’ मुक्कामी