भारताने अफगानिस्तानात इसिस विरोधात लढाई सुरू करावी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

नवी दिल्ली : काश्‍मीर प्रश्‍नावरून भारताल मदतीचा प्रस्ताव दिल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नवीन आवाहन केले आहे. भारताने अफगाणिस्तानात इसिसविरोधात लढाई सुरू करावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे. एवढेच नाही तर इसिससोबत दोन हात करण्यासाठी पुढाकार घेण्याचा सल्लादेखील ट्रम्प यांनी दिला आहे.

भारत, रशिया, टर्की, इराण, इराक आणि पाकिस्तान या देशांनी अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेटविरोधात लढाई आणखी तीव्र केली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारत अफगाणिस्तानात आहे पण ते इसिसशी लढा देत नसून आम्ही ही लढाई लढत आहोत असे ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. तालिबानशी शांततेच्या वाटाघाटी सुरु असल्यामुळे अमेरिका अफगाणिस्तानात सैन्य ठेवणार कि, मागे घेणार त्यासंबंधीच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. पाकिस्तान पूर्ण क्षमतेने इसिस विरोधात लढत नसल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा अफगाणिस्तानातील भारताच्या भूमिकेवर टीका केली होती. इराक आणि सीरियामधून आयसिस हद्दपार होत असताना त्यांना अफगाणिस्तानात जम बसवण्याची संधी मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.