नवी दिल्ली – श्रीनगर ते शारजा या गोफर्स्ट एअरलाईन्सच्या विमानाला पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्याची अनुमती द्यावी, अशी विनंतर भारताकडून त्यांना करण्यात आली आहे.
पाकिस्तानने मंगळवारी या विमानाला आपली हवाई हद्द वापरण्यास अनुमती नाकारली होती. त्यामुळे या विमानाला गुजरात मार्गाचा वापर करावा लागला होता. लांबून हे विमान न्यावे लागत असल्याने त्याची ऑपरेटिंग कॉस्ट खूप येते.
गो फर्स्ट एअर लाईन्सने 23 ऑक्टोबर पासून श्रीनगर ते शारजा अशी विमान सेवा सुरू केली आहे. गो फर्स्ट एअर लाईन्सचे आधीचे नाव गो एअर असे आहे. त्यांच्या काही फेऱ्यांना पाकिस्तानने अनुमती दिली होती पण नंतर त्यांनी 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या अधीत मात्र या विमानांना पाकिस्तानी हद्दीतून येजा करण्यास अनुमती नाकारली आहे.