नवी दिल्ली – देशात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 37 हजार नवे रुग्ण मिळाले आहेत. तर करोनामुळे 488 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन सकारात्मकता दर आता 17.22% आहे. जाणून घ्या देशातील करोनाची स्थिती काय आहे.
India reports 3,37,704 new COVID cases (9,550 less than yesterday), 488 deaths, and 2,42,676 recoveries in the last 24 hours
Active case: 21,13,365
Daily positivity rate: 17.22%10,050 total Omicron cases detected so far; an increase of 3.69% since yesterday pic.twitter.com/sZburym82e
— ANI (@ANI) January 22, 2022
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 13 हजार 365 झाली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 88 हजार 884 झाली आहे. आकडेवारीनुसार, 2 लाख 42 हजार 676 लोक करोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 63 लाख 1 हजार 482 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.