नवी दिल्ली – देशात करोनाचा कहर सुरूच आहे. कधी बाधित रुग्णांची संख्या कमी होते तर कधी झपाट्याने वाढ होते. सोमवारी (24 जानेवारी) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 3 लाख 6 हजार 64 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. जे रविवारच्या तुलनेत 27 हजार 469 कमी आहे.
India reports 3,06,064 new COVID cases (27,469 less than yesterday), 439 deaths, and 2,43,495 recoveries in the last 24 hours
Active case: 22,49,335
Daily positivity rate: 20.75% pic.twitter.com/nckbG2NfUN— ANI (@ANI) January 24, 2022
करोनामुळे गेल्या 24 तासांत 439 लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे देशात अजूनही 21 लाखांहून अधिक लोक (21,87,205) संक्रमित आहेत. देशभरात गेल्या 24 तासात 2 लाख 59 हजार 168 लोक करोनामुक्त झाले आहेत.
देशात सर्वाधीक रुग्ण हे कर्नाटक राज्यात मिळाले आहेत. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू व गुजरात या राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.