नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा करोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 2 हजार 858 नवीन रुग्ण आढळले आहेत. काल शुक्रवारी रोजी 2 हजार 841 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती. याशिवाय करोनामुळे गेल्या 24 तासांत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 096 वर पोहचली आहे. देशभरात आतापर्यंत 4,25,76,815 रुग्ण बरे झाले आहेत.
#COVID19 | India reports 2,858 fresh cases, 3,355 recoveries, and 11 deaths in the last 24 hours.
Total active cases are 18,096
Daily positivity rate (0.59%) pic.twitter.com/ObQOxPWAhL
— ANI (@ANI) May 14, 2022
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 858 करोना रुग्ण मिळाले तर करोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत करोनाच्या रुग्णांमध्ये आज थोडी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. सद्या देशात 18 हजार 096 करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.