नवी दिल्ली – देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून दोनदिवसांपासून दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण मिळत आहे. याशिवाय ओमायक्रानच्या रुग्णांत सुद्दा वाढ होताना दिसून येत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत करोना विषाणूचे 2 लाख 64 हजार 202 नवीन रुग्ण आढळले असून 315 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची आतापर्यंत 5 हजार 753 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कालच्या तुलनेत आज 16 हजार 785 जास्त रुग्ण आले आहेत, काल करोना विषाणूचे 2 लाख 47 हजार 417 रुग्ण आढळले होते.
India reports 2,64,202 fresh COVID cases (6.7% higher than yesterday) and 1,09,345 recoveries in the last 24 hours
Active case: 12,72,073
Daily positivity rate: 14.78%Confirmed cases of Omicron: 5,753 pic.twitter.com/GGQ8P7TzRZ
— ANI (@ANI) January 14, 2022
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख 72 हजार 73 झाली आहे. त्याचबरोबर या करोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 85 हजार 350 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 1 लाख 9 हजार 345 लोक बरे झाले असून आतापर्यंत 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.