नवी दिल्ली – करोनाचा वेग अद्यापही कायम आहे. गेल्या 24 तासांत देशात करोना संसर्गाचे 2 लाख 58 हजार 89 नवे रुग्ण आढळले असून या साथीमुळे 385 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दरम्यान 1 लाख 51 हजार 740 करोना रुग्ण बरे झाले आहेत.
India reports 2,58,089 COVID cases (13,113 less than yesterday), 385 deaths, and 1,51,740 recoveries in the last 24 hours.
Active case: 16,56,341
Daily positivity rate: 119.65%Confirmed cases of Omicron: 8,209 pic.twitter.com/Fi345RsMuw
— ANI (@ANI) January 17, 2022
केंद्रिय आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकेवाडीनुसार, करोनाच्या नवीन रुग्ण वाढीनंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 16 लाख 56 हजार 341 वर पोहोचली आहे. या साथीमुळे आतापर्यंत 4 लाख 86 हजार 451 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब ही की कालच्या तुलनेत 13 हजार रुग्ण कमी आले आहेत.