नवी दिल्ली – रविवारच्या तुलनेत करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 10 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 9 हजार 918 नवीन रुग्ण आढळले असून, या कालावधीत 959 जणांचा मृत्यू झाला आहे.
India reports 2,09,918 new #COVID19 cases, 959 deaths and 2,62,628 recoveries in the last 24 hours
Active case: 18,31,268 (4.43%)
Daily positivity rate: 15.77%Total Vaccination : 1,66,03,96,227 pic.twitter.com/ZTN2OJXQbE
— ANI (@ANI) January 31, 2022
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 2 लाख 62 हजार 628 रुग्ण बरे झाले आहेत. यानंतर देशातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या आता 18 लाख 31 हजार 318 झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट 15.77 टक्क्यांवर आला आहे. याशिवाय देशभरात आतापर्यंत एकूण 166 कोटी लसीकरण करण्यात आले आहे.