रशियाच्या अतिपूर्वेकडील विकासासाठी भारताकडून 1 अब्ज डॉलरचे पतधोरण

ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांची घोषणा

व्लादिवोस्तोक : रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाच्या विकासासाठी भारताकडून 1 अब्ज डॉलरचे पतसहाय्य देण्यात येणार आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली. नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्याया भागाच्या विकासासाठी भारत रशियाच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करेल असे पंतप्रधानांनी आज जाहीर केले. पाचव्या “ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये बोलताना पंतप्रधानांनी ही घोषणा केली. भारताकडून अन्य देशाला अशाप्रकारे विशेष पतसहाय्य दिले जाणे ही अशाप्रकारचे एकमेव प्रकरण असावे, असे मोदी म्हणाले.

“अतिपूर्वेच्या विकासासाठी भारत 1 अब्ज डॉलरची पत पुरवणार आहे. भारत सरकारने “ऍक्‍ट ईस्ट’ या धोरणनुसार पूर्व आशियामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.’ असे मोदी म्हणाले. या पत उपलब्धतेमुळे आर्थिक मुत्सद्देगिरीच्या विकासास आणि आमच्या मित्रराज्य देशांमधील संबंध वाढीस नवीन गती देईल, असा विश्‍वास आपल्याला वाटतो आहे. आम्ही आमच्या प्राधान्य सहकार्यात सक्रिय भागीदार राहू. जिथे भारत खूप सक्रिय आहे त्या अतिपूर्वेतील हा आमचा लॉन्चिंग पॅड आहे, असे ते म्हणाले.

रशिया आणि भारतातील मैत्री केवळ सरकारी संवादापुरती मर्यादित नाही. मात्र नागरिक आणि निकटच्या व्यवसायिक संबंधांमध्येही ही मैत्री असल्याचेही मोदी म्हणाले. रशियाच्या अतिपूर्वेशी असलेला भारताचा संबंध दीर्घकाळापासूनचा आहे. व्लादिवोस्तोक येथे वाणिज्य दूतावास उघडणारा भारत पहिला देश होता. आता भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणखीन आणखी दृढ करूया. तेथील भारतीय समुहाने केलेल्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे. मला खात्री आहे की येथे रशियाच्या पूर्वेकडील क्षेत्रातील प्रगतीसाठी भारतीय प्रवासी सक्रीय योगदान देतील, अशी आपल्याला खात्री असल्याचे मोदी म्हणाले.

रशियाचा अतिपूर्वेकडील भाग आशिया खंडाबरोबरचे संबंध अधिक मजबूत करतो. हा प्रदेश धैर्यवान आणि प्रतिभावान लोकांचा आहे. रशियाच्या अतिपूर्वेबरोबर सहकार्य वाढविण्यासाठी भारत उत्सुक आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी दिलेल्या माहितीनुसार ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’च्या समारोपप्रसंगी भारताने जवळपास 5 अब्ज डॉलर मूल्याचे करार केले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय कंपन्यांनी रशियातील तेल आणि वायू क्षेत्रातील उद्योगांमध्ये 7 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली. 2001 मध्ये “ओएनजीसी’विदेश या कंपनीने रशियातील अतिपूर्वेकडील सखलिन 1 प्रकल्पात गुंतवणूक केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)