नवी दिल्ली – इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेकडील ग्राहकांची संख्या पाच कोटी पेक्षा जास्त झाली आहे. आता फक्त पेटीएम आणि एअरटेल पेमेंट बॅंकेकडे इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेपेक्षा जास्त ग्राहक आहेत.
हे नवीन ग्राहक डिजिटल पद्धतीने मिळविण्यात आले आहेत.
पोस्टाची देशात 1. 36 लाख कार्यालये आहेत. त्यातील 1.20 लाख कार्यालये ग्रामीण भागात आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून ही खाती उघडण्यात आली आहेत. पोस्टातील 1.47 लाख व्यक्ती ग्राहकांना घरपोच बॅंकिंग सेवा देत आहेत.
आम्ही भारतातील सर्वात मोठी पेमेंट बॅंक होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असल्याचे पोस्ट विभागाचे सचिव विनायक पांडे यांनी सांगितले.