#IndvPak : ‘भारत-पाकिस्तान’ सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज

आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी विश्वचषकामध्ये एकमेकांना भिडणार असल्याने क्रिकेट फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, या दोन्ही संघातील महामुकाबला पाहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही विशेष तयारी केली आहे. बॉलिवूड अभिनेता ‘शाहरुख खान’ने त्याच्या सोशल मीडिया आकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, मुलगा आर्यन आणि शाहरुख खान हे दोघे एकत्रित भारत आणि पाकिस्तान सामना पाहणार आहेत. त्यासाठी दोघेही एकसारखी जर्सी परिधान करून बसले आहेत.

मात्र, या दोन्ही बाप-बेट्यांच्या जर्सीवर “द लायन किंग” या अॅनिमेटेड चित्रपटातील पात्रांची नावं लिहली आहेत. शाहरुखच्या जर्सीवर ‘मुफसा’ तर आर्यनच्या जर्सीवर ‘सिम्बा’ हे नाव दिसून येत आहे. ‘पितृदिना निमित्त भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज आहोत’. असं देखील शाहरुखने आपल्या पोस्ट मध्ये म्हंटलं आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)