नवी दिल्ली – आशिया कप येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. आशिया स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला असून त्यात अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. तर एका मोठ्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान अमिरातीत ही स्पर्धा रंगणार आहे. याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी संघाची घोषणा देखील केली आहे. सोबतच आशिया स्पर्धेसाठी संघात १५ खेळाडूंची निवड केलीय . कर्णधार पदाची जबाबदारी बाबर आझम याच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.
पाकिस्तानचा संघही यावेळी आशिया चषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. या सामन्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी हसन अलीला आशिया कपच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. चांगली गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी परतला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. आता तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.यावेळी युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहलाही नेदरलँड आणि आशिया कप या दोन्ही संघात स्थान देण्यात आले आहे. हसन अलीला वगळण्यात आले असून नसीमला संधी देण्यात आली आहे.
नेदरलँड वनडेसाठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हरिस रौफ, इमाम-उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी, जाहिद महमूद.
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहनी, उस्मान कादिरी .