दुबई – आयसीसी आयोजित टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील लढत 24 ऑक्टोबरला होणार आहे.
या स्पर्धेचे दोन गट जाहीर करण्यात आले होते व त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे.
ग्रुप 2 मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ आहेत, तर ग्रुप 1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज हे संघ आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात 19 मार्च 2016 रोजी अखेरची टी-20 लढत झाली होती. कोलकाता येथील या लढतीत भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला होता.