#INDvNZ : ईशांत शर्मा कसोटी मालिकेला मुकणार

नवी दिल्ली : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जायबंदी असल्याने न्यूझीलंड दौ-यावरील कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. ईशांतच्या जागी आता दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी रणजी करंडक स्पर्धेदरम्यान घोटा दुखावल्याने इशांतला २१ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या कसोटी मालिकेसाठी अनफिट घोषित करण्यात आले आहे. दिल्लीकडून विदर्भाविरूध्द गोलंदाजी करताना इशांतच्या घोट्याला इजा झाली.

बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, ‘ईशांतच्या एमआरआय अहवालानुसार त्याची दुखापत ग्रेड ३ ची असून घोट्याचे स्नायू फाटलेले आहेत. त्याला सहा आठवड्यांचा विश्रांती व पुनर्वसन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.भारतीय संघासाठी खरोखर हा एक मोठा धक्का आहे.’

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांचा समावेश असलेल्या भारताच्या वेगवान हल्ल्याचा ईशांत शर्मा अविभाज्य भाग मानला जातो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here