मुंबई : उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांसंदर्भात एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स घालणाऱ्या महिला आपल्या स्वतः च्या मुलांना काय संस्कार देणार असे म्हणत रावत नवा वाद निर्माण केला आहे.
देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विवादित विधानावर बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नातं नाव्या नंदाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी नाव्या नंदाने शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, कपडे बदलण्याआधी आपली मानसिकता बदलायला हवी.
View this post on Instagram
काय म्हणाली नाव्या नंदा पोस्ट केली आहे की,’WTF, आमचे कपडे बदलण्यापेक्षा पहिले तुम्हाला तुमची मानसिक बदलायला हवी. मी नेहमीच अभिमानाने रिप्ड जीन्स घालणार आहे. मुख्यमंत्री आम्हाला चांगले वातावरण देऊ शकतात का? तिने पुढे लिहिले आहे की,मी माझी रिप्ड जीन्स घालणार, धन्यवाद. आणि या जीन्सला मी अभिमानाने घालणार.’अशा पोस्ट सह तिने एक फोटोही शेअर केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, तीरथ सिंह रावत यांनी या वक्तव्याबाबत देशातील सर्व महिलांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.