आॅकलंड : सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि अनुभवी फलंदाज राॅस टेलर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी २७४ धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Innings Break!
New Zealand post a total of 273/8 on the board. Will #TeamIndia level the series today?#NZvIND pic.twitter.com/o6ZH1JpW7K
— BCCI (@BCCI) February 8, 2020
भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ८ बाद २७३ धावा केल्या. न्यूझीलंडकडून फलंदाजीत मार्टिन गप्टिलने ७९ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारासह सर्वाधिक ७९ तर राॅस टेलरने ७४ चेंडूत ६ चौकार व २ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. तर, हेनरी निकोल्सने ४१(५९), टाॅम ब्लंडेलने २२(२५) आणि काइल जेमीसनने नाबाद २५(२४) धावांची खेळी केली.
Overs 1-10: 52/0
Overs 11-20: 108/1
Overs 21-30: 159/3
Overs 31-40: 195/7
Overs 41-50: 273/8Ross Taylor's 73* after Guptill's 79 has helped 🇳🇿 to a fighting total despite Indian bowling brilliance in the middle overs.#NZvIND pic.twitter.com/HJW3KSRkPd
— ICC (@ICC) February 8, 2020
भारतीय संघाकडून गोलंदाजीत फिरकीपटू युजवेंद्र चहलने १० षटकात ५८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले तर शार्दुल ठाकूरने १० षटकांत ६० धावा देत २ गडी बाद केले. रविंद्र जडेजाने १० षटकात ३५ धावा देत १ गडी बाद केला. जसप्रीत बुमराह आणि नवदीप सैनीला एकही विकेट मिळाली नाही. बुमराहने १० षटकात ६४ तर सैनीने १० षटकात ४८ धावा दिल्या. शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ फलंदाज धावबाद केला.