‘भारत’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात ?

मुंबई – मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपटाचा ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान आणि कतरीना ही जोडी पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत. यात दोघांचा तरुणपणापासून तर वयोवृद्धचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे. मात्र मोस्ट अवेटेड ‘भारत’ चित्रपट वादाच्या  भोवऱ्यात सापडला आहे.  ‘भारत’ हे चित्रपटाचे शीर्षक लोकांच्या भावना दुखावणारे असल्यामुळे  चित्रपटाच्या नावावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करून सलमानच्या या चित्रपटाचे टायटल बदलण्याची मागणी केली आहे. सलमानच्या चित्रपटाचे नाव हे बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्याचे उल्लंघन आहे. या कायद्यानुसार, ‘भारत’ शब्दाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येत नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्यामुहूर्तावर रिलीज होणार आहे. या ट्रेलरने युट्युबवर धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत हा ट्रेलर 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ईदच्या मुहूर्तावर म्हणजे  ५ जूनला ‘भारत’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.