#CWC19 : भारतीय संघात दोन बदल, ‘या’ दोन खेळाडूंना मिळाली संधी

लीड्‌स – विश्वचषक स्पर्धेत प्राथमिक फेरीतील भारत विरूध्द श्रीलंका या सामन्यास काही वेळातच लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुख करूणारत्ने याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारताने साखळी गटात दुसरे स्थान घेत यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. आजचा सामना जिंकून आघाडीस्थान घेण्याची त्यांना संधी आहे.आजच्या सामन्यासाठी भारताने संघात दोन बदल केले आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना विश्रांती देत संघात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना संधी दिली आहे.

दरम्यान, श्रीलंकेचा संघात देखील एक बदल करण्यात आला आहे. जेफ्री व्हँडरसे यांच्याजागी थिसारा परेरा याला संघात स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंका संघ –

दिमुथ करुणारतने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, लाहिरु थिरिमाने, धनंजया डी सिल्वा, थिसारा परेरा, इसुरू उदाना, लसिथ मलिंगा, कसुन राजिथा

भारतीय संघ –

के एल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

Leave A Reply

Your email address will not be published.