नवी दिल्ली – नेशन्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या खेळाडूंनी रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाचा पराभव करत चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी भारतीय खेळाडूंना युरोपकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
युरोपविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या विदित गुजरातीने लेवॉन अरोनियनचा पराभव करत थाटात सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पी. हरिकृष्ण याला पराभवाचा सामना करावा लागला. तसेच ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याला मॅसिम वॅचिअरशी बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे अव्वल गुणांच्या जोरावर युरोप संघाने बाजी मारली. महिलांच्या सामन्यात कोनेरू हम्पीने ऍना मुजिकशी बरोबरी केली. स्पर्धेच्या सातव्या फेरीत आनंद आणि हरिकृष्ण यांनी विजय मिळवल्याने रेस्ट ऑफ वर्ल्डवर भारताने मात केली.