भुवनेश्वर – हॉकी विश्वकरंडक स्पर्धेच्या क्रॉसओव्हर सामन्यात निर्धारीत वेळेत 3-3 अशी बरोबरी साधल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये न्यूझीलंडने यजमान भारताचा 4-5 असा पराभव केला. या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. यासह 1975 नंतर पदक जिंकण्याचे भारताचे स्वप्नही भंगले. आता 24 जानेवारीला उपांत्यपूर्व फेरीत न्यूूझीलंडचा सामना गतविजेत्या बेल्जियमशी होणार आहे.
Shoaib Akhtar | “जर चित्रपट बनवला तर केस ठोकेन”, स्वतःच्याच बायोपिकवरून शोएब अख्तर भडकला
जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या भारताने पहिल्या सत्रामध्ये 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर, न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. भारताकडून ललित उपाध्याय (17वे मिनिट), सुखजीत सिंग (24वे) आणि वरुण कुमार (40वे) यांनी गोल केले. न्यूझीलंडकडून सॅम लेन (28वा) आणि केन रसेल (43वा) आणि शॉन फिंडले (49वा) यांनी दोन पेनल्टी-कॉर्नरच्या मदतीने प्रत्युत्तर गोल करत देताना बरोबरी साधली.
India out of the Hockey World Cup 2023.
— Johns. (@CricCrazyJohns) January 22, 2023
निर्धारित 60 मिनिटांपर्यंत सामना 3-3 असा बरोबरीत होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचे गोलरक्षक पी.आर. श्रीजेश आणि क्रिशन पाठक यांनी एकूण चार बचाव केले. त्यांच्या भक्कम बचावानंतरही भारताला विजय मिळवता आला नाही. भारतातर्फे पेनल्टी शूटआउटमध्ये पल राजकुमारने दोन तर सुखजित सिंग, हरमनप्रित सिंगने प्रत्येकी एक गोल केला. तर न्यूझीलंडकडून लेन सॅम, फिलिप्स हेडन, बुड्स निक यांनी प्रत्येकी एक तर फिंडले शॉनने दोन गोल करत संघाला विजयी केले. भारतीय संघ यापूर्वी, 2018 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता.