चेन्नई – बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला संमिश्र यश मिळत आहे. एकीकडे कोनेरू हम्पी व आर. वैशाली यांच्या कामगिरीमुळे भारताने जॉर्जियावर 3-1 असा विजय मिळवला तर दुसरीकडे खुल्या गटात भारताला माजी विजेत्या अर्मेनियाविरुद्ध 1.5-2.5 असा पराभव पत्करावा लागला असला.
ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशने सातत्यपूर्ण कामगिरी करीत गॅब्रिएल सर्गिसिआनचा पराभव केला. पण, बी. अधिबन आणि रौनक साधवानी यांनी पराभव पत्करल्यामुळे भारताला अपयशाचाही सामना करावा लागला.
अन्य लढतींमध्ये खुल्या गटात भारताच्या अ संघाने उझबेकिस्तानविरुद्ध 2-2 अशी बरोबरी साधली. भारताच्या क संघाने लिथुआनियाचा 3.5-0.5 असा पराभव केला. महिलांमध्ये भारताच्या ब संघाने चेक प्रजासत्ताकविरुद्ध2-2 अशी बरोबरी केली. तर भारत क संघाने ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा पराभव केला.