ख्राइस्टचर्च : न्यूझीलंडने मालिकेतील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघाचा 7 विकेटनी पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिकंली आहे.
New Zealand sweep India 2-0!
It’s a seven-wicket victory for the @BLACKCAPS and they take all 120 World Test Championship points!
? ? ? #NZvIND pic.twitter.com/VX9Vu6DtWs
— ICC (@ICC) March 2, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 242 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 वर आटोपला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने पहिल्या डावानंतर न्यूझीलंडवर 7 धावांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव 124 वर संपुष्टात आला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 132 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान न्यूझीलंड संघाने 36 षटकांत 3 बाद 132 धावा करत सहज पूर्ण केले.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपली पहिली कसोटी मालिका खेळणाऱ्या काइल जेमिसन यांना सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. जेमिसन याने पहिल्या डावात 5 गडी बाद केले होते तर नवव्या क्रमांकावर फलंदाजीस येत महत्वपूर्ण 49 धावांची खेळी केली होती. तर वेगवान गोलंदाज टिम साउदी हा मालिकावीर ठरला.
What a maiden series this has been for him ?#NZvIND pic.twitter.com/gooSry4ADX
— ICC (@ICC) March 2, 2020
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचा दुसरा पराभव
भारतीय संघास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसरा पराभव पत्करावा लागला आहे. दोन्ही पराभव या मालिकेतच स्विकारावे लागले आहेत. न्यूझीलंड संघाने दोन सामने जिंकत 120 गुण प्राप्त केले असून 180 गुणांसह ते तिसऱ्या स्थानी तर आॅस्ट्रेलिया संघ 296 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर, भारतीय संघ 9 सामन्यातील सात विजय आणि दोन पराभवासह 480 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे.
संक्षिप्त धावफलक : पहिला डाव – सर्वबाद 242 (पृथ्वी शाॅ 54, चेतेश्वर पुजारा 54, हनुमा विहारी 55, काइल जेमिसन 5-45, टिम साउदी 2-38, ट्रेंट बोल्ट 2-89), दुसरा डाव – पृथ्वी शाॅ 14, चेतेश्वर पुजारा 24,रविंद्र जडेजा 16, ट्रेंट बोल्ट 4-28, टिम साउदी 3-36) वि. न्यूझीलंड – पहिला डाव – सर्वबाद 235 ( टाॅम लाथम 25, टाॅम ब्लंडेल 30, काइल जेमिसन 49, काॅलिन डी ग्रैंडहोम 26, नील वॅगनर 21,जसप्रीत बुमराह 3-62, मोहम्मद शमी 4-81, रविंद्र जडेजा 2-22) दुसरा डाव – 3 बाद 132 (टाॅम लाथम 52, टाॅम ब्लंडेल 55, जसप्रीत बुमराह 2-39, उमेश यादव 1-45)