नवी दिल्ली – एफआयएच ज्युनिअर विश्वकरंडक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय महिला संघास नेदरलॅंड्सकडून 3-0 असा मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचे तसेच विजेतेपदही मिळवण्याचे भारताचे स्वप्न भंग झाले.
आतापर्यंत तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या नेदरलॅंड्सने भारताचा पराभव केल्यामुळे भारताला आता मंगळवारी ब्रॉंझपदकाच्या लढतीत खेळावे लागेल. उपांत्य फेरीत भारताला एकही गोल करता आला नाही.
या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीने इंग्लंड संघाचा 8-0 असा दणदणीत पराभव केला. आता जर्मनीची अंतिम लढत नेदरलँडशी हाेईल.