करोनाबाबतच्या चुकीच्या माहितीविरोधात 12 देशांसह भारताची आघाडी

संयुक्त राष्ट्र – करोना विषाणूसंदर्भात चुकीची माहिती पसरवली जात असल्याच्या विरोधात भारताने 12 देशांबरोबर आघाडी केली आहे. जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्याबाबत अनेक उलट सुलट समज पसरवले जात आहेत. यातून करोनाच्या आपत्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना अडथळाच होतो आहे. त्यामुळे या गैरसमज पसरवले जाण्याविरोधात संयुक्‍त राष्ट्रातील 130 देश आग्रही आहेत.

या संदर्भात ऑस्ट्रेलिया, चिली, फ्रान्स, जॉर्जिया, भारत, इंडोनेशिया, लालविया, लेबानॉन, मॉरिशस, मेक्‍सिको, नॉर्वे, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी पुढाकार घेतला आहे. या शिवाय 132 देशांनी यासंदर्भातील माहितीची योग्य तपासणी करण्याची मागणी लावून धरली आहे.

करोनाच्या फैलावाला नियंत्रित करण्याबरोबरच या संदर्भातील चुकीची माहिती पसरवली जाणे हे देखील तितकेच धोकादायक आहे. चुकीच्या माहितीमध्ये आरोग्यविषयक चुकीचे आणि धोकादायक सल्ले, द्वेष पसरवणारे विचार आणि वैचारिक कारस्थानांचा समावेश आहे.

जगासमोरील या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध माहितीचे योग्य विश्‍लेषण व्हायला पाहिजे, असे संयुक्‍त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टोनियो ग्युटरेझ यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात संयुक्‍त राष्ट्राने चुकीच्या माहितीविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला भारताचा पाठिंबा असल्याचे भारताच्या कायम प्रतिनिधींनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.