“सीओपीडी’ने मरणाऱ्यांमध्ये भारत जगात एक नंबर

मरणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक

पुणे- धूम्रपान, प्रदूषित धूर, दीर्घकाळापर्यंत चुलीवर स्वयंपाक करणे यांसारख्या कारणांमुळे “क्रोनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) हा आजार होण्याचा धोका अधिक असून, या श्वसनरोगाने मरणाऱ्यांचे प्रमाण जगात भारतात सर्वाधिक आहेत.

फुफ्फुसाच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. श्वास घ्यायला त्रास होणे, तीव्र खोकला होणे अशी “सीओपीडी’ची सामान्यपणे लक्षणे आहेत.”सीओपीडी’ हा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला होणारा सर्वसाधारण खोकला नसून तो धोकादायक असलेला फुफ्फुसाचा आजार आहे, ज्यात रुग्णाचा मृत्युही होऊ शकतो.

या रोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण संपूर्ण जगभरात चीनमध्ये होते. परंतु 2016 च्या “ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी’ नुसार भारताने यामध्ये चीनलाही मागे टाकले असून, यामुळे मरणाऱ्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे.

दम लागणे, श्वसनाला त्रास होत असल्यामुळे शारीरिक हालचालींवर मर्यादा येणे असेही प्रकार या आजारात उद्‌भवतात. याची लागण झाल्यानंतर काही दिवसांनी जुने लक्षणे कमी होतात आणि नवी लक्षणे विकसित होतात तेव्हा “सीओपीडी’ हा “फ्लेअर अप’ (अधिक तीव्र) होतो. फ्लेअर-अप्सला “एक्‍ससीब्रेशन्स’ किंवा “लंग्स अटॅक’ असे देखील म्हटले जाते. सीओपीडीचा योग्य उपचार न केल्यास अधिक धोका निर्माण होऊ शकतो आणि मृत्यू देखील होऊ शकते.

भारतात “सीओपीडी’चे जवळपास 55 दशलक्षांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. धूम्रपान, औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारा प्रदूषित धूर, दीर्घकाळापर्यंत चुलीवर स्वयंपाक करणे यांसारख्या कारणांमुळे हा आजार होण्याच्या धोका अधिक असतो ज्याला आता “लंग्स अटॅक’ म्हणतात.

रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण याची जशी नियमित तपासणी केली जाते तशी तपासणी फुफ्फुसाचीही करणे आवश्‍यक आहे. तसेच याविषयी जनजागृतीदेखील झाली पाहिजे. आपल्या देशात प्रदूषणाची पातळी जास्त आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या रोगांना सहज आमंत्रण मिळत असते.”सीओपीडी’मुळे तर फुफ्फुसाच्या क्षमतेवर आणि कार्यावर परिणाम होऊ शकतो, असे उरो ज्ज्ञांचे मत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.