भारत – जपान दरम्यान “जिमेक्‍स’युद्धसरावाला सुरुवात

Madhuvan

नवी दिल्ली- भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स यांच्यात 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान उत्तर अरबी समुद्रात “जिमेक्‍स’ हा द्विपक्षीय सागरी युद्धसराव होत आहे. सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन जिमेक्‍स युद्धसरावास 2012 पासून सुरुवात झाली. 2018 मध्ये विशाखापट्टणम येथे मागील युद्धसराव पार पडला होता.

भारत आणि जपान यांच्यात नौदल सहकार्याची गेल्या काही वर्षांत व्याप्ती वाढली आहे. “जिमेक्‍स-20′ दरम्यान प्रगत मोहिमा आणि युद्धसराव नियोजन आहे,

“जिमेक्‍स-20′ मध्ये सागरी मोहीमांची व्याप्ती, मोठ्या प्रमाणात प्रगत कवायती कौशल्याच्या माध्यमातून उच्च प्रतिची आंतर-कार्यप्रणाली आणि संयुक्त मोहीम कौशल्यांचे प्रदर्शन सादर करण्यात येईल. बहु-आयामी व्युहात्मक युद्धसरावात शस्त्रास्त्र गोळीबार, क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि जटील पृष्ठभाग, पाणबुडीरोधक आणि हवाई युद्ध अभ्यासातून दोन्ही नौदलांदरम्यानचा एकत्रित समन्वय मजबूत होईल.

“जिमेक्‍स 20′ हा युद्धसराव तीन दिवस चालणार आहे आणि कोविड-19 पार्श्वभूमीवर विना संपर्क केवळ सागरी स्वरूपात आयोजित केले जाणार आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित स्टेल्थ विनाशक “चेन्नई’, लढाऊ जहाज “तरकश’, फ्लीट टॅंकर “दीपक’ हे रिअर ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाकडून सादर करण्यात येईल. जपानकडून हेलिकॉप्टर विनाशक “कागा’, क्षेपणास्त्र विनाशक “इकाझुची’ सादर करण्यात येईल. जहाजांव्यतिरिक्त पी 8 आय लांब रेंज सागरी गस्त विमान, एकात्मिक हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने या युद्धसरावात सहभागी होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.