आता लसीचा तुटवडा भासणार नाही; भारताला लवकरच ‘फायझर’ लसीचे 5 कोटी डोस मिळण्याची शक्‍यता

वॉशिंग्टन, दि. 15- करोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला भारतात सुरुवात झाली आहे. पण लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यावर आता उपाय म्हणून सरकारच्या वतीने लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती करणारी कंपनी फायझर यांच्या दरम्यान एक उच्च स्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून देशाला या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पाच कोटी लसीचे डोस मिळण्याची शक्‍यता आहे.

सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या लसींच्या वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. त्यात आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची आयात करण्यात आली आहे. फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी त्यांच्या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी, अशी विनंती भारत सरकारकडे केली होती. आता फायझरच्या लसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता असून मॉडर्नासोबतही चर्चा सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

फायझरने भारत सरकारच्या लसीकरणाच्या व्यापक कार्यक्रमासाठी ना नफा या तत्वावर लसीचा पुरवठा करण्याची ऑफर भारत सरकारला दिली होती. त्या संबंधी भारत सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहितीही कंपनीच्या वतीने अगोदरच देण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.