“स्रीसुरक्षा’ विषयात जगात भारत खूपच मागे!..

– शांताराम वाघ, पुणे 

“थॉमसरॉयटर्स फौडेशन’ या संस्थेने जागतीक स्तरावर महिलांचीसुरक्षा व त्याविषयक प्रश्‍नांचा सखोल अभ्यासकेला. त्या संस्थेच्या अभ्यासांतील निष्कर्षांवर त्यानी आपली मते व्यक्त केली आहेत. भारतातील महिलांची सुरक्षेची स्थिती धोकादायक स्थितीत आहे असे अहवालांत म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतापेक्षा युध्दजन्य स्थिती असलेले देश म्हणजेच सिरिया व अफगाणिस्तान या देशापेक्षांही भारत स्त्रियांच्या सुरक्षेत खालच्या नंबरवर आहे. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारामुळे भारताचा क्रम वरचा आहे, दिवसेंदिवस या अत्याचाराच्या प्रमाणांत वाढच होत आहे. 2007 पासून 2016 पर्यंत या अत्याचारांत 83% टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. नॅशनल क्राईम ब्युरो यांच्या माहितीनुसार भारतांत दररोज 100 हून अधिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल होतात. हे सर्वेक्षण महिलांच्या अधिकारावर काम करणाऱ्या 550 तज्ञांनी केले आहे.

स्वातंत्र्यानंतर सुमारे सात दशकांनंतरही भारतात स्त्रियांच्या सुरक्षेत अपेक्षेप्रमाणे सुधारणा नाही. स्त्रियांवरील अत्याचारासाठी त्वरित खटल्यांच्या निकालाची तरतूद हवी.तसेच शिक्षाही जबर हवी. म्हणजे अशा गुन्हेगारांना जरब बसेल. शक्‍यतो स्त्री अत्याचारविषयक गुन्हे हे जलदगती न्यायालयातच चालवले गेले पाहिजेत आणि 60 ते 90 दिवसांत त्यावर निकाल होणे आवश्‍यक आहे. न्यायालयात हेलपाटे मारणे आणि आपली उरली-सुरली अब्रु घालवणे यापासून महिलांना दिलासा देण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष कंबर कसताना दिसत नाही. हा विरोधाभास कुठेतरी थांबला पाहिजे, असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)