वॊशिग्टन : करोनाच्या बाबत भारत सध्या अत्यंत भयावह स्थितीतून जात आहे, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. एंथोनी फाऊंसी यांनी व्यक्त केले. करोना साथीच्या संदर्भातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारत सध्या भयावह स्थितीतून जात आहे. काळ तेथे जगातील कोणत्याही देशात नोंदवली गेली त्यापेक्षा अधिक बाधित संख्या नोंदवली गेली, असे ते म्हणाले.
करोनाच्या नव्या विषाणुचे गुणधर्म अद्याप पुरेसे स्पष्ट झाले नाहीत. त्यामुळे लसीचा त्यावर होणारा परिणाम नेमकेपणाने सांगता येणार नाही. मात्र लसीकरण करावे अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेचा साथ नियंत्रण विभाग भारतातील त्या विभागाच्या संपर्कात आहे. त्या देशाला तांत्रिक पाठींबा आणि मदत पुरवत आहोत. नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आम्ही त्यांना सुचवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, व्हाईट हाऊसचे करोना समन्वयक जेफ झायंट म्हणाले, भारताच्या सार्वजनिक आरोग्याविषयी अमेरिकेची दीर्घकालीन बांधिलकी आहे.
करोना प्रतिसादाबाबत आम्ही त्यांच्यासह कार्यरत आहोत. क्वाड राष्ट्रांमधील भागीदारी आणि पथके सर्व सरकारांना मदत पुरवत आहेत, असे त्यांनी सांगितले.
ही एक जागतिक साथ आहे. ती नियंत्रणात ठेवली नाही तर काय परिस्थिती ओढवू शकते हे भारताच्या उदाहरणावरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आम्ही सारवाढीक गुंतवणूक लसीच्या निर्मितीत केली आहे. आम्ही मॉडेर्मा आणि फायझरची लस 16 वर्षापुढील सर्वांना खुली केली आहे असे ते म्हणाले.