वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातला भारत एक महत्वाचा भागीदार असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी व्यक्त केले आहे. ते काल भारत वाणिज्य परिषदेच्या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे बोलत होते.
भारत हा समान विचार असणारा एक विश्वासू साथीदार असल्याचेही ते म्हणाले. प्रशांत महासागर क्षेत्रात आणि जागतिक स्तरावर भारत हा अमेरिकेचा सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातला महत्वाचा भागीदार म्हणून पुढे येत आहे. भारताबरोबर आपले संबंध अधिक दृढ करायला अमेरिका इच्छुक आहे, असेही त्यांनी सांगितले.
डोनाल्ड ट्रप्म यांनी आयोजित केलेल्या पुढच्या जी-7 देशांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.