आज जागतिक छायाचित्र दिन, आज पासून 182 वर्षा आधी 1839 मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने 1839 ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.
The India International Photographic Council (IIPC) ने या संस्थेचे संस्थापक श्री. ओ.पी. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, जगभरातील विविध देशातील छायाचित्रण संस्थांकडे एक प्रस्ताव पाठवला की छायाचित्रण या विषयासाठी वर्षातला एक दिवस साजरा केला जावा. हा प्रस्ताव सगळ्यानी ऊचलून धरला आणि IIPC तर्फे सर्वप्रथम भारतात “जागतिक छायाचित्रण दिन” साजरा केला गेला 19 ऑगस्ट 1991 साली. त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन ( #WorldPhotographyDay ) म्हणून साजरा केला जातो.
शब्दात लिहिता येत नाही. तसेच जे बोलण्यातून व्यक्त होत नाही. प्रत्येक छायाचित्रकार एक कलाकार असतो. अनेक छायाचित्रांना तो बोलके करतो. अश्या सर्व छायाचित्रकारांना जागतिक छायाचित्रण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइलने टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता येते.