भारताने ‘या’बाबतीत इटलीलाही टाकले मागे

नवी दिल्ली : जगात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.भारतातही करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. करोनाच्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेमध्ये भारतानं आता इटलीलाही मागे टाकलं आहे. भारतात सध्या ६३ हजार १७० पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहे. करोनाशी निगडीत रिअल टाईम डेटा मिळवणाऱ्या ‘वर्ल्डोमिटर्स’ या बेवसाईटच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे.

चीनननंतर सर्वाधित करोनाचा प्रभाव हा इटलीवर पडला होता. इटलीमध्ये आतापर्यंत करोनामुळे ३२ हजार ३३० जणांना मृत्यू झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या २ लाख २५ हजारांपेक्षाही अधिक आहे. तर भारतात आतापर्यंत १ लाख ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच देशात दररोज ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या दृष्टीने पाहिले तर अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्स या देशांमध्येच भारतापेक्षा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. अमेरिकेत सध्या ११ लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर रशियात २ लाख २० हजार, ब्राझिलमध्ये १ लाख ५७ हजार आणि फ्रान्समध्ये ९० हजार अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताचा रिकव्हरी रेट हा ४० टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. २५ मार्च रोजी लॉकडाउन जाहीर होण्यापूर्वी तो ७ टक्के इतका होता. रुग्णालयाची गरज केवळ ७ टक्क्यांपेक्षा कमी लोकांना आहे. तसच भारतात करोनामुळे होणारा मृत्यूदरही कमी असल्याचे आरोग्य मंत्रायलाने म्हटले आहे. भारतात आतापर्यंत जवळपास ३ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत करोनामुळे ९५ हजार जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर युनायटेड किंगडममध्ये ३५ हजार ७०४, इटलीमध्ये ३२ हजार ३२० तर फ्रान्समध्ये २८ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.