योग संस्कृती ही भारताने जगाला दिलेलं देणं; महेंद्र निंबाळकर

वाई – माहिती तंत्रज्ञानाच्या युगात योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निरोगी जीवन व्यतित करण्यासाठी नियमित योगा, प्राणायाम करणे आज काळाची गरज आहे, असे उद्‌गार वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांनी किसनवीर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात काढले. एन.सी.सी. कॅंडेटसाठी आयोजित योगा शिबिराचा समारोप समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी पतंजली योग समितीचे अशोकराव मलटणे, रामदास राऊत, पांडुरंग भिलारे, लेप्टनंट-प्रा.समीर पवार उपस्थित होते.

यावेळी धनंजय मलटणे, पांडुरंग भिलारे, रामदास राऊत यांची भाषणे झाली. वाई पतंजली योग समितीद्वारे योग दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.