भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने आज पाकवर कारवाई करत बदला घेतला आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तसेच बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले. तर भारताच्या कारवाईत २०० ते ३०० अतिरेकी ठार झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

दरम्यान, १४  फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. या स्फोटात भारताचे ४० जवान शहीद झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.