पुणे – बहुतांश मोबाइल कंपन्यांनी मोबाइलचे कॉल आणि इंटरनेटचे दर वाढविण्याचे जाहीर केले आहे. मात्र, तरीही भारतातील मोबाइल इंटरनेटचे दर हे जागतिक तुलनेत कमीच आहेत.
लवकरच होणाऱ्या दरवाढीबाबत जनमानसात अस्वस्थता पसरू नये यासाठी हे स्पष्टीकरण दूरसंचार विभागाने केले आहे. ब्रिटनमधील टेबल को युके नावाची संस्था जगभरातील इंटरनेटच्याच्या दराचा तुलनात्मक आढावा घेते. या माहितीचा आधार घेऊन दूरसंचार मंत्रालयाने भारतातील मोबाइलचे दर आणखीही कमी असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार भारतातील मोबाइल इंटरनेटचे दर साधारणपणे 0.26 डॉलर प्रति गीगा बाईट आहेत.
ब्रिटनमधील दर 6.66 डॉलर प्रति गीगा बाईट व अमेरिकेतील दर 12. 37 डॉलर प्रति गीगा बाईट इतके आहेत. जागतिक पातळीवर मोबाइल इंटरनेट दर सर्वसाधारणपणे 8.50 हॉलर प्रति गीगा बाईट आहेत. त्यापेक्षाही भारतातील दर कितीतरी कमी आहेत असे दूरसंचार मंत्रालयाने म्हटले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात म्हणजे 2014 मध्ये मोबाइल इंटरनेटचे 268 रुपये प्रति गीगा बाईट इतके होते हे आता 11 रुपये प्रति गीगा बाईट इतके कमी झालेले आहेत.
भारतातील कॉल रेट
आणि डेटा रेट जागतिक प्रमाणाच्या फार कमी असल्यामुळे भारतातील मोबाइल कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे, असे समजले जाते. याच कारणामुळे या कंपन्यांनी या आठवड्यापासून 42 टक्क्यांपर्यंत दरवाढ केलेली
आहे.