अंतिम फेरीसाठी सज्ज होण्यासाठी भारताला संधी

इपोह (मलेशिया) – सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारताने यजमान मलेशियावर मात केल्यानंतर भारताने बुधवारी झालेल्या सामन्यात कॅनडाचा 7-3 अशा गोल फरकाने धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारताचा अंतिम फेरीत आधीच समावेश झाला होता. जपान, मलेशिया आणि कॅनडा वर मात केल्यानंतर, आता साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात पोलंड वर विजय मिळवून अंतिम फेरीसाठी सज्ज होण्याची अजून एक संधी भारताला मिळणार आहे.

चार सामन्यांमध्ये तीन विजय आणि एक बरोबरीत सोडवत भारतीय हॉकी संघाने सहा देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत १० गुणांसह अव्वल स्थान प्राप्त केले आहे. दक्षिण कोरिया सामन्यातील खेळ सोडल्यास या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने उत्तम खेळ केला आहे. त्यामुळे जेतेपद मिळविण्यासाठी भारतीय संघाला यावेळी सुवर्णसंधी असून अखेरच्या सामन्यात उत्तम खेळ करावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.