नवी दिल्ली – संपूर्ण देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी जीव सोडत आहेत. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून रुग्णांचे हाल होत आहे. भारतावर करोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढं येत आहेत. त्यातच आता गुगल आणि मायक्रोसॉफ्टने भारताच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला करोना संकटाशी लढण्यासाठी १३५ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. नडेला यांनी ट्विट करून म्हटलं की, मायक्रोसॉफ्टकडून भारताला दिलासा देण्यात येणार असून ऑक्सिजन साहित्य खऱेदी करण्यासाठी मदत करण्यात येईल.
सुंदर पिचाई यांनी भारतातील मेडिकल सप्लायसाठी युनिसेफ आणि ‘GiveIndia’ला १३५ कोटी रुपये फंड देण्याच जाहीर केलं आहे. पिचाई म्हणाले की, १३५ कोटींच्या निधीत दोन अनुदान आहे. पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये GiveIndia ला देण्यात येणार आहेत. यामधून करोनाने प्रभावित झालेल्या कुटुंबांनी रोख मदत देण्यात येईल. दुसरं अनुदान ‘यूनिसेफ’ला भारतात मेडीकल साहित्य सप्लाय करण्यासाठी देण्यात येणार आहे. या अनुदानात गुगलच्या कर्मचाऱ्यांकडून ३.७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.