करोना संसर्गाविरोधात भारताने मजबूत लढा दिला : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कौतुक

जिनिव्हा  – करोना संसर्गाविरोधात भारताने वेगाने पावले उचलत मजबूत लढा दिला अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या करोना विरोधातल्या लढ्याचे कौतुक केले आहे. भारताने अशी रीतीने लढा दिल्यामुळेच करोनामुळे झालेल्या नुकसानीतून भारताला वेगाने उभारी घेण्याची संधी असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे.

या साछीच्या काळात भारताने सर्वाधिक गरजुंना मदत देण्यासह, पतधोरणातली सुलभता, तरलतेसंदर्भातल्या तरतुदी, वित्तीय क्षेत्राची संर्वंकषता, नियमन धोरणे अशा उपाययोजना राबवत संरचनात्मक सुधारणा कायम ठेवल्याचं नाणेनिधीने म्हटले आहे.

नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने नुकतीच भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थितीच्या मूल्यांकनासाठी भारताच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली.

संसर्गाच्या कठीण काळातही भारताने कामगार सुधारणा आणि खासगीकरणासारखी धोरणं राबवत संरचनात्मक सुधारणा करणे सुरुच ठेवल्याचे नाणेनिधीने नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.