भूक निदेशांकांतही भारताची अधोगतीच

117 देशात 102व्या स्थानी; नेपाळ आणि पाकिस्तानातही थोडी बरी स्थिती

नवी दिल्ली : जागतिक भूक निर्देशांकात भारताची पिछेहाट झाली असून नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांचाही निर्देशांकात भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कुपोषण आणि देशातील भूकेवर स्थान दिले जाते. 117 देशांत भारताचा क्रमांक 102 आहे.

नेपाळचा 73, बांगलादेश 88 आणि पाकिस्तान 98 व्या स्थानावर आहे. मानवतेसाठी काम करणाऱ्या दोन स्वयंसेवी संस्थांनी हा निर्देशांक बनवला आहे. आयर्लंडची कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची वेल्थहंगरलाइफ या संस्थांनी हा निर्देशांक बनवला आहे. जागतिक अन्न दिनाच्या दिवशी ही धक्कादायक बातमी हाती आली आहे.

या निर्देशांकात 100 पैकी गुण दिले जातात. त्यात 0 गुण मिळवणाऱ्या देशाची स्थती उत्तम असते तर 100 गुण मिळवणाऱ्या देशाची स्थिती अत्यंत गंभीर असते. भारताने यात 30.3 गुण मिळवले आहेत ही बाब चिंताजनक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कमी असणाऱ्या वजनाचे प्रमाण, अल्पआहार, वयोमानाप्रमाणात कमी असणारी उंची आणि बालमृत्यू दर असे पाच निकष ठरवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.