भारताचा पाकिस्तानशी उपांत्य फेरीचा सामना

ढाका: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांदरम्यान येथे सुरू असलेल्या इमर्जिंग आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत एकमेकांशी लढावेच लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

दोन्ही देशांचे संघ द्विपक्षीय मालिकेत जरी आमनेसामने येत नसले तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तसेच आशियाई क्रिकेट संघटनेने आयोजीत केलेल्या स्पर्धेत त्यांना एकमेकांशी खेळण्याचा ड्रॉ पडला तर सहभागी व्हावेच लागते. आता या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचे समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

बांगलादेशमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत आशियाई खंडातील संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा 23 वर्षांखालील संघ सहभागी झाला असून संघाचे नेतृत्व शरत रवि करत आहे.

या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना या दोन संघात होणार आहे. उपांत्य फेरीचा हा सामना ढाका येथे बुधवारी शेर-ए-बांगला मैदानावर होणार आहे. भारताने हॉंगकॉंग तर पाकिस्तानने ओमनला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. आता या सामन्याते जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत दाखल होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.