India-EU FTA Deal : भारत ऊर्जा सप्ताह २०२६ ला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील एका प्रमुख मुक्त व्यापार करारावर (FTA) स्वाक्षरी करण्याची घोषणा केली. त्यांनी याची घोषणा करताना,”हा करार जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील मजबूत भागीदारीचे प्रतीक आहे. तसेच त्याचा थेट फायदा भारताच्या उद्योग, ऊर्जा क्षेत्र आणि सामान्य जनतेला होईल”असे म्हटले. तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा करार भारताच्या उत्पादन क्षमतांना बळकटी आणि सेवा क्षेत्राला नवीन आधार देणार आहे.” India-EU FTA Deal : भारत एक प्रमुख ऊर्जा अर्थव्यवस्था India-EU FTA Deal : पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत आज एक प्रमुख ऊर्जा अर्थव्यवस्था बनला आहे. भारत अक्षय ऊर्जा, तेल आणि वायूसारख्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे आणि जगभरातील अनेक देशांसोबत सहकार्याने काम करत आहे.” पंतप्रधानांनी यावेळी,”आजच्या भारतातील प्रत्येक क्षेत्रात सुधारणा होत आहेत. या सुधारणांमुळे देशातील गुंतवणूकीचे वातावरण सुधारले आहे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत” असेही सांगितले. हेही वाचा : India-EU trade deal : भारत ७०% टॅरिफ कमी करणार ; भारत-यरोपियन युनियन व्यापार करारादरम्यान २७ देशांसाठी मोठी बातमी भारत-यूके व्यापार करार मजबूत होईल पंतप्रधानांनी सांगितले की,”भारत-ईयू एफटीए गेल्या वर्षी भारत आणि यूके यांच्यात झालेल्या व्यापार कराराला देखील समर्थन देईल. यामुळे युरोपसोबत भारताचा एकूण व्यापार आणखी मजबूत होईल.” या कराराचे उद्दिष्ट भारत आणि युरोपियन युनियनमधील द्विपक्षीय व्यापार वाढवणे आणि आर्थिक संबंध उंचावणे आहे. सरकारचा असा विश्वास आहे की यामुळे गुंतवणूक, रोजगार आणि तांत्रिक सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील. गोव्यात भारत ऊर्जा सप्ताहाचे उद्घाटन गोव्यात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला अनेक देशांचे मंत्री, उद्योग नेते आणि धोरण तज्ञ उपस्थित होते. संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री सुलतान अहमद अल जबेर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. हेही वाचा : EU-India Relations : युरोपियन युनियनने म्हणाले,”भारताशिवाय आम्ही अपूर्ण ,” भारत-ईयू कराराचे कौतुक India-EU FTA Deal : भारत आणि युरोपियन युनियनमधील हा ऐतिहासिक नवीन करार १.४ अब्ज भारतीय आणि युरोपियन नागरिकांसाठी प्रचंड संधी घेऊन येतो आणि दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमधील अधिक समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हा करार जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजे २५ टक्के आणि जागतिक व्यापाराच्या एक तृतीयांश भाग व्यापतो. हेही वाचा : India EU Trade Deal : युरोपियन युनियनसोबतच्या व्यापार करारामुळे देशात काय स्वस्त होईल? ; अंमलबजावणी कधी होणार ? वाचा