आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत भारताला सांघिकमध्ये दुहेरी यश

पुणे: विश्‍वविजेते प्रशांत मोरे आणि एस अपूर्वा यांच्या अप्रतिम खेळाच्या बळावर भारताने अनुक्रमे श्रीलंका आणि मालदीववर 3-0 असे सफाईदार विजय नोंदवत आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिला या दोन सांघिक किताबांवरील आपला कब्जा कायम ठेवला.

पुरुष स्पर्धेच्या एकेरीमध्ये प्रशांतने निशांत फर्नांडोचा पराभव केला. भारताला दुसऱ्या एकेरीमध्ये झहीर पाशाने विजय मिळवून देताना शाहिद ईल्मीचा पाडाव केला.

महिलांमध्येही रश्‍मी कुमारीने मालदीवच्या अमिनाथ विधाध हिचा पराभव केला. अपूर्वा समोर अमिनाथ विषमा पूर्णपणे विष्प्रभ ठरली. दुहेरीत आयेशा साजिद आणि के नागज्योती या भारतीय जोडीने मालदीवच्या अमिनाथ सुबा आणि तिमथ रायना यांचा पराभव केला. राजेश गोहिल आणि इर्शाद अहमद यांनी दुहेरीमध्ये दिनेथ दुलक्षणे आणि अनास अहमद यांचा धुव्वा उडवला.

Leave A Reply

Your email address will not be published.