#INDvWI: नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

हैदराबाद: कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाचा आज वेस्ट इंडिजशी 3 टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे. या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात असले,तरी पुढील वर्षी रंगणा-या टी-२० वर्ल्ड कपसाठी संघबांधणी करण्याकरिता भारतासाठी ही मालिका महत्वाची आहे.

तर दुसरीकडे विंडीजला भारताविरूध्दच्या मागील पाचही टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे येणारे दडपण झुगारून खेळ करण्याचे आव्हान विंडिज संघापुढे आहे.

दरम्यान, हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमवर थोड्याच वेळात सामन्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला असून कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.