#NZvIND : भारताचा न्यूझीलंडवर 35 धावांनी विजय, मालिका 4-1 ने खिशात

वेलिंग्टन – अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या, अंबाति रायुडू आणि युजवेंद्र चहल यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारताने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 35 धावांनी पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 ने आपल्या नावावर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठी 253 धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ 44.1 षटकांत सर्वबाद 217 वरच आटोपला. न्यूझीलंडकडून फलंदाजीमध्ये जिमी नीशमने सर्वाधिक 44 तर केन विलियमसनने 39 आणि टाॅम लाथमने 37 धावा केल्या. भारतीय गोलंदाजीत युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 तर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवने 1 गडी बाद केला.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सुरूवातीचे चार फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची 4 बाद 18 अशी स्थिती झाली होती. रोहित शर्मा 2, शिखर धवन 6, शुभमन गिल 7 आणि महेंद्रसिंग धोनी 1 धावांवर तबूंत परतले. मात्र त्यानंतर अंबाति रायुडूच्या 90, विजय शंकर व हार्दिक पांड्या यांच्या प्रत्येकी 45 आणि केदार जाधवच्या 34 धावांच्या खेळीवर भारताने 252 धावसंख्येपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून मैट हेनरीने सर्वाधिक 4 तर ट्रेंट बोल्टने 3 गडी बाद केले. जिमी नीशमने 1 गडी बाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)