नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी अष्टपैलु क्रिकेटपटू सुरेश रैना याचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे गाझियाबाद येथे रविवारी निधन झाले. त्रिलोकचंद रैना असे त्यांचे नाव असून ते कर्करोगाने गेले काही महिने आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
त्रिलोकचंद रैना हे लष्करात अधिकारी होते. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये बॉम्ब बनवण्यात ते निष्णात होते. गाझियाबाद येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रैना कुटुंबीय मुळचे काश्मिरी पंडित असून जम्मू-काश्मीरमध्ये रैनावारी हे त्यांचे मूळगाव आहे.
Very sad to hear Suresh Raina’s father @ImRaina RIP uncle ji 🙏🙏
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 6, 2022
1990 सालच्या दशकात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद मोठ्या प्रमाणात सुरु होता. त्यावेळी त्रिलोकचंद रैना यांनी आपले गाव सोडले व मुरादनगर येथे स्थायिक झाले. त्यांनी आपल्या बेताच्या पगारातही सुरेश रैनाला त्याच्या क्रिकेटमधील कारकीर्दीसाठी कायम पाठींबा दिला. त्यांच्या याच पाठींब्याच्या जोरावर रैना भारतीय संघाचा अव्वल अष्टपैलु क्रिकेटपटू बनला.