नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 10 हजार 197 नवीन रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,28,555 आहे, जी गेल्या 1,28,555 दिवसांतील सर्वात कमी आहे. तसेच गेल्या 24 तासात करोनामुळे 301 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 हजार 134 जणांनी करोनावर मात केली आहे.
दैनंदिन संसर्ग दर 0.82 टक्के आहे, जो गेल्या 44 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, साप्ताहिक संसर्ग दर 0.96 टक्के आहे, जो गेल्या 54 दिवसांपासून दोन टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे.
दरम्यान, काल मंगळवार रोजी देशात नऊ महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोना बाधित रुग्ण मिळाले होते. दहा हजारापेक्षा कमी रुग्ण मिळाल्यानंतर आज पुन्हा दहा हजारापेक्षा जास्त रुग्ण मिळाले आहेत.